पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथील विविध पोलीस ठाण्यांत, तसेच प्रशासकीय अधिकार्यांना निवेदने
रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे), १८ मार्च (वार्ता.) – होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथील लोकप्रतिनिधी, पोलीस, प्रशासन यांसह अन्य ठिकाणी निवेदने देण्यात आली. सर्वांनीच योग्य कृती करण्याचे आश्वासन दिले. ही सर्व निवेदने देतांना विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
१. भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. गौरव शेडगे, श्री. रोहित देशमाने आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्वजित चव्हाण उपस्थित होते.
२. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट, तसेच फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगवणे, ‘राजपुरोहित समाज संघा’चे सभासद श्री. हिम्मतसिंह राजपुरोहित, ‘वेदांत सेवा समिती’चे सभासद श्री. सुधाकर संगतवार उपस्थित होते.
३. वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोलप यांना देण्यात आलेले निवेदन त्यांच्या वतीने पी.एस्.आय. दुरंगे मॅडम यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. जेधे, धर्मप्रेमी श्री. विनायक परांडेकर आणि श्री. विवेक ओतारी उपस्थित होत्या.
४. पिंपरी-चिंचवड पोलीस उपआयुक्त परिमंडळ १, तसेच अतिरिक्त आयुक्त २ जितेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले.
५. भाजपच्या नगरसेविका सौ. मानसीताई देशपांडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सेवेतील साधक सौ. चांदोरकर, हितचिंतक सौ. माधुरी पिंपळे, साधना सत्संगातील जिज्ञासू श्रीमती अनुपमा करी आणि श्रीमती गोरे उपस्थित होते.
देहूगाव येथील मुख्याधिकार्यांनी निवेदनाच्या छायाचित्राचे ‘फ्लेक्स’ बनवून गावात जागोजागी लावण्याचे दिले आदेश !
देहूगाव नगरपंचायत येथील मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव (सीईओ) यांना देहूगाव येथील धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी श्री. परमेश्वर आंधळे आणि योगेश आढाव यांनी निवेदन दिले. निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांनी निवेदन वाचले आणि निवेदनाचे छायाचित्र भ्रमणभाषवर काढून त्यांच्या कर्मचार्याला पाठवून त्याचा ‘फ्लेक्स’ बनवून देहूगावमध्ये जागोजागी लावण्याचा आदेश दिला. त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य व्यवस्थितपणे समजून घेतले आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक केले, तसेच ‘दिवाळीसारख्या सणांना फटाक्यांमुळे होणार्या प्रदूषणाविषयी आम्ही पण मोहीम राबवत आहोत. तुमच्याकडून त्या मोहिमांमध्ये पण आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे’, असे त्यांनी सांगितले.