परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती त्यांच्या काही ग्रंथात घेण्याचे कारण
‘सनातनच्या काही ग्रंथांमध्ये साधकांना माझ्या संदर्भात आलेल्या अनुभूतींचा उल्लेख केलेला असतो. तो माझा मोठेपणा दाखवण्यासाठी नाही, तर अध्यात्माचे विविध पैलू जिज्ञासूंना अभ्यासता यावेत, यासाठी असतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.२.२०२२)
‘सर्वसाधारण व्यक्तीला जीवनात येणार्या अडचणींमुळे ईश्वराची आठवण येते आणि ती साधनेकडे वळते. मी मात्र केवळ अध्यात्म शिकण्याच्या जिज्ञासेने साधनेकडे वळलो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.१२.२०२१)