(म्हणे) ‘देशभरातील काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता !’
|
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे ‘काश्मिरी राष्ट्रा’विषयी द्वेष पसरवला गेला असून देशभरातील काश्मिरी मुसलमान विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे, अशी भीती ‘नॅशनल कॉन्फरन्स’ पक्षाचे अध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली. जर भारतातील कोणत्याही राज्यामध्ये कुणा काश्मिरी विद्यार्थ्यावर आक्रमण झाले, तर केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकार यांना त्याचे दायित्व घ्यावे लागेल, असेही अब्दुल्ला म्हणाले. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातून पुष्कळ असत्य पसरवले जात आहे, असा आरोपही अब्दुल्ला यांनी केला आहे. (असत्य आरोप करणारे अब्दुल्ला ! – संपादक)