(म्हणे) ‘मिशनरी शाळांमध्ये आमच्याकडून ‘बायबल’ वाचनाची अपेक्षा करण्यात आली नाही !’ – साकेत गोखले, तृणमूल काँग्रेस
(म्हणे) ‘लोकांचा निवडण्याचा अधिकार हिरावून घेणे, हा फॅसीस्टवादाचा (हुकूमशाहीचा) मूलभूत नियम !’
|
नवी देहली – गुजरात शासनाने इयत्ता ६ वी ते १२ वी च्या अभ्यासक्रमामध्ये भगवद्गीता शिकवण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. त्यावर तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांना पोटशूळ उठला आहे.
#BhagavadGita made compulsory in #Gujarat Schools for Classes 6 to 12https://t.co/PIr1kXG0hg
— Zee News English (@ZeeNewsEnglish) March 18, 2022
गुजरात शासनाच्या या निर्णयाचा त्यांनी ट्वीट करत विरोध केला आहे. ते म्हणाले, ‘‘आम्ही अनेक जण मिशनर्यांच्या शाळांमध्ये शिक्षण घेतले आहे. आमच्यापैकी अनेक जणांचा हा अनुभव आहे की, आम्हाला कधीच बायबलचे वाचन अथवा ते शिकण्यासाठी विचारण्यात आले नाही कि तशी अपेक्षा करण्यात आली नाही.’’
Many of us who went to missionary/convent schools will testify to the fact that we were NEVER asked or expected to read or learn the Bible.
Freedom of choice – that’s what sanghis hate the most.
The basic tenet of fascism is to take away the element of choice & free will. https://t.co/nMGZvptoZ8
— Saket Gokhale 🇺🇦 (@SaketGokhale) March 17, 2022
गोखले पुढे म्हणाले की, ‘संघवाल्यांना लोकांच्या वैयक्तिक अधिकारांविषयी घृणाच असते. लोकांचा निवडण्याचा आणि इच्छेनुसार कृती करण्याचा अधिकार हिरावून घेणे, हा फॅसीस्टवादाचा (हुकूमशाहीचा) मूलभूत नियम आहे.’