पुण्यात लाच घेतांना महिला तलाठ्याला अटक, एका धर्मांधावर गुन्हा नोंद !
लाचखोरीत महिला आघाडीवर असणे दुर्दैवी ! नको त्या गोष्टीत महिलांनी पुरुषांची बरोबर न करता लाच घेणार्यांना उघड करण्यामध्ये पुढाकार घ्यावा. धर्माचरणानेच नीतिमान अधिकारी निर्माण होतील, हे नक्की ! – संपादक
पुणे – खरेदी केलेल्या भूमीची सातबारा उतार्यावर नोंद घेण्यासाठी २० सहस्र रुपयांची लाच घेतांना वर्षा धामणे या महिला तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १६ मार्च या दिवशी अटक केली. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे. या प्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली असून खासगी व्यक्ती अकबर याच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार यांनी म्हाळुंगे येथे वर्ष २०१७ मध्ये भूमी खरेदी केली होती. प्रारंभी या भूमीची नोंद करण्यासाठी खासगी व्यक्ती अकबर याने १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर आरोपी धामणे यांनी ही नोंद सातबारा-उतार्यावर करण्यासाठी ३० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली. (प्रतिदिन लाचखोरीची असंख्य उदाहरणे समोर येत आहेत. लाचखोरीची कीड मुळापासून नष्ट करण्यासाठी नीतिमान समाज निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी जनतेला शासनाने आतातरी धर्मशिक्षण द्यावे. – संपादक)