‘तुम्हाला चौकशी करायची, तर खुशाल करा आणि १ मासात निकाल लावा !’ – चंद्रशेखर बावनकुळे, आमदार, भाजप
मुंबई, १८ मार्च (वार्ता.) – भाजपचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळातील महावितरणच्या कामांची चौकशी करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महाविकास आघाडी सरकारला पुढीलप्रमाणे खुले आव्हान दिले आहे. ‘गेली अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारला चौकशी कराविशी वाटली नाही. आता महावितरणच्या ३ विभाग संचालकांकडून चौकशी करवून काय मिळणार आहे ? त्यासाठी त्रयस्थ यंत्रणा नेमावी लागेल. सरकारने खुशाल चौकशी करावी आणि १ मासांत निकाल लावावा.’ १६ मार्च या दिवशी ते विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते.