हिंदुत्वाचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या मागणीसाठी हिंदूंनी धर्म समजून घेतला पाहिजे ! – अनिकेत अर्धापुरकर, हिंदु जनजागृती समिती

यवतमाळ येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’

श्री. अनिकेत अर्धापूरकर

यवतमाळ, १७ मार्च (वार्ता.) – भारतामध्ये चालू असणारा जिहाद आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गापर्यंत पोचला आहे. अन्य धर्मियांच्या हत्या झाल्यावर प्रसिद्धीमाध्यमांसमोर येणारे मानवाधिकारवाले हिंदु नेत्यांच्या हत्या झाल्यावर मात्र गप्प रहातात. कोरोना काळात लक्षावधी हिंदूंचे धर्मांतर झाले. सण-उत्सवाच्या वेळी हिंदूंचा बुद्धीभेद करून त्यांना धर्माचरणापासून दूर केले जात आहे. त्यामुळे हिंदु धर्मावर होणारे आघात थांबवण्यासाठी भारत हे हिंदु राष्ट्र झाले पाहिजे. साधनेमुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढते. हिंदुत्वाचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या मागणीसाठी हिंदूंनी धर्म समजून घेतला पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिकेत अर्धापूरकर यांनी केले. ते १२ मार्च या दिवशी गंगाकाशी मंगल कार्यालय, लोहारा येथे पार पडलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) भारती हेडाऊ यांनी मार्गदर्शन केले.

सभेचा लाभ पुष्कळ जिज्ञासूंनी घेतला. या वेळी श्रीरामजन्मोत्सव समितीचे श्री. मनोज औदार्य, श्री मुंगसाजी महाराज भजनी मंडळाचे श्री. शिवाजी पुरी, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीचे श्री. विनोद अरेवार, भाजपचे नगरसेवक श्री. भास्कर केळापुरे, भाजप महिला आघाडीच्या शहरप्रमुख सौ. उषाताई खटे उपस्थित होत्या.

मंदिरांचे सरकारीकरण रहित करायला हवे ! – डॉ. (सौ.) भारती हेडाऊ, सनातन संस्था

डॉ. (सौ.) भारती हेडाऊ

पूर्वीचे राजे मंदिराला भूमी आणि पैसा दान करून मंदिराचा जीर्णोद्धार करायचे; परंतु आज सरकारीकरण झालेल्या मंदिरांची भूमी बळकावली जात आहे. मंदिराचा पैसा हजयात्रा, चर्चचे बांधकाम, तसेच निधर्मी योजनांसाठी वापरला जात आहे, ही देवनिधीची होत असलेली लूट आहे. मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आणि प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे मंदिर सरकारीकरण रहित करून मंदिर संस्कृती वाचवली पाहिजे, यासाठी सरकारकडे मागणी करावी लागेल.

क्षणचित्रे

१. समितीच्या सौ. दुर्गा पारधी आणि श्री. प्रशांत सोळंके यांनी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके करून दाखवली.

२. सर्व धर्माभिमानी पूर्णवेळ विषय लक्ष देऊन ऐकत होते. धर्माचरणाच्या कृती करण्यासाठी हात वर करून अनुमोदन देत होते.

३. सभा संपल्यानंतर ११ धर्माभिमान्यांनी वक्त्यांशी चर्चा करून समितीच्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी सिद्धता दर्शवली.

सहकार्य

१. गंगाकाशी मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक श्री. नीलेश रोकडे यांनी सभेसाठी कार्यालय विनामूल्य उपलब्ध करून दिले.

२. कुलस्वामिनी साऊंडच्या वतीने सर्व ध्वनीयंत्रणा विनामूल्य मिळाली.

अभिप्राय

१. श्री. प्रवीण राठोड – सभेतील मार्गदर्शन ऐकल्यावर मला धर्म समजला. आज मी जागृत झालो. यापूर्वी मला धर्म आणि संस्कृती काहीच ठाऊक नव्हते.

२. श्री. अजय सिंग – सभेमुळे हिंदूंमध्ये जागृती झाली. हिंदु समाजाला जागृत करणे आवश्यक आहे.