पाकच्या सिंधमध्ये पोलीस अधिकार्याकडूनच ५ हिंदु मुलांची धर्मांधाला विक्री !
पाकमधील असुरक्षित हिंदूंचे रक्षण कोण आणि कधी करणार ? – संपादक
कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील मीरपूर खास येथील पोलीस अधिकारी मोमिन लगारी याने ५ हिंदु मुलांना महंमद बक्स लाघरी याला ५ लाख रुपयांना विकल्याची माहिती ‘व्हॉईस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी’च्या ट्विटर खात्यावरून देण्यात आली.
This is heartbreaking.
This proves that authorities too are involved in atrocities meted out on religious minorities. #Hindu people were being sold out like animals in Sindh.#PlightOfPakistanMinorities https://t.co/0Ffsz6qKgh— Voice of Pakistan Minority (@voice_minority) March 15, 2022
२ अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण
सिंधच्या खैरपूर येथे आरती मेघवार (वय १४ वर्षे) आणि घोटकी येथील राबिया भील (वय १३ वर्षे) यांचे अपहरण करण्यात आले आहे.
A 13 yr old #Hindu minor girl, Rabia Bheel who was abducted a few days ago has been converted and married. She was appeared in court and recorded her statement, the judge sent her with her husband despite her being minor, rather than shelter home. https://t.co/U7kez3j7H5 pic.twitter.com/Jit4LIidJM
— Voice of Pakistan Minority (@voice_minority) March 16, 2022
यापूर्वी बिंदीया नावाच्या मुलीचेही अपहरण करण्यात आले होते. अपहरण करून तिचे धर्मांतर करण्यात आले, तसेच तिचा मुसलमान तरुणाशी निकाह लावून देण्यात आला. याविषयी पोलिसांत तक्रार करूनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले, अशी माहिती ‘सिंध नेरेटिव्ह’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली.