‘द कश्मीर फाइल्स’च्या प्रसिद्धीसाठी लोकांच्या नावीण्यपूर्ण कल्पना !

सांगली-कोल्हापूर येथे प्रत्येक चित्रपटगृहातील प्रत्येक खेळ ‘हाऊसफूल्ल’

शिरढोण, सांगली येथील ‘केशर अमृततुल्य चहा’ने सिद्ध केलेला फलक

सांगली, १७ मार्च (वार्ता.) – ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची प्रसिद्धी आता सामान्य हिंदु लोकांनीच हातात घेतली असून त्याच्या प्रसिद्धीसाठी लोकच पुढाकार घेऊन नावीण्यपूर्ण कल्पना राबवत आहेत. सांगली जिल्ह्यात शिरढोण येथील ‘केशर अमृततुल्य चहा’ यांनी चित्रपटाचे तिकीट दाखवा आणि ‘चहा विनामूल्य प्या’, असे विज्ञापन सिद्ध करून दुकानात लावले आहे.

शिरढोण, सांगली येथील ‘केशर अमृततुल्य चहा’ने सिद्ध केलेला फलक

त्याच समवेत राष्ट्रप्रेमी श्री. अवधूत गायकवाड (दादा) यांनी सलग २ दिवस ईश्वरपूर येथील माणकेश्वर चित्रपटगृहात शिराळा शहरातील सर्व युवक-युवती यांच्यासाठी २०० तिकिटे विनामूल्य उपलब्ध करून दिली होती. ईश्वरपूर येथील धर्मप्रेमी श्री. अमोल ठाणेकर यांनी १०० विनामूल्य तिकीटे उपलब्ध करून दिली होती.

श्री. अवधूत गायकवाड (दादा) यांनी २०० तिकीट उपलब्ध करून दिल्याची सामाजिक माध्यमातील ‘पोस्ट’

या चित्रपटास दर्शकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील ‘मल्टीप्लेक्स’ (अनेक पडदा असलेले चित्रपटगृह) आणि सिंगल स्क्रिन (एक पडदा असलेले चित्रपटगृह) येथे या चित्रपटाचा प्रत्येक खेळ ‘हाऊसफूल्ल’ होत आहे. प्रारंभी केवळ ४ खेळ अशी अल्प असलेली संख्या अनेक चित्रपटगृहांनी ८, १० आणि त्याही पुढे नेली आहे. अनेक लोक गटागटाने-समुहाने चित्रपट पहात आहेत. एकूणच काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आता सर्वसामान्य हिंदूच पुढाकार घेत आहेत. सामाजिक माध्यमांद्वारेही चित्रपटाचा प्रसार जोरात होत असून चित्रपटाचे समीक्षण, तसेच चित्रपटाशी संबंधित अनेक घटना लोकच विविध गटांमध्ये प्रसारित करत आहेत.