परेच्छेने वागणार्या आणि साधनेची तीव्र तळमळ असणार्या ओडिशा येथील सुश्री (कु.) सुनीता छत्तर (वय ४२ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – सोमवार, १४ मार्च २०२२ या दिवशी असलेल्या श्री काशी विश्वनाथ शृंगारोत्सवाच्या पवित्र दिनी काशी नगरीतील (वाराणसी सेवाकेंद्रातील) साधकांसाठी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संगात अनेक साधकांनी ‘भक्तीसत्संगामध्ये सांगितलेले प्रयत्न केल्यावर कोणते लाभ झाले ?’, याविषयी सांगितले. साधिका सुश्री (कु.) सुनीता छत्तर (वय ४२ वर्षे) यांनी त्यांनी केलेले प्रयत्न आणि झालेले लाभ सांगायला प्रारंभ केल्यावर उपस्थित साधकांना वातावरण शांत आणि स्थिर असल्याचे जाणवले, तसेच ‘त्या बोलत असतांना आनंद जाणवत आहे’, अशी साधकांना अनुभूती आली. हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांनी सुश्री (कु.) सुनीता छत्तर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांच्यात झालेले पालट सांगितले, तसेच त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगत त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून त्या जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली.
या वेळी पू. नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सुश्री (कु.) सुनीता छत्तर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुश्री (कु.) सुनीता छत्तर यांनी त्याचे मनोगत व्यक्त केले, तसेच अन्य साधकांनी त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली.
सुश्री (कु.) सुनीता छत्तर यांचे मनोगतमनोगत व्यक्त करतांना सुश्री (कु.) सुनीता छत्तर म्हणाल्या, ‘‘मी लहानपणापासून शिवाची पूजा करणे, सोळा सोमवारचे व्रत करणे, अशा प्रकारे भगवान शिवाची उपासना करत होते. सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना चालू केल्यावर मी शिवाला प्रार्थना केली होती की, मी तर तुझीच झाली आहे, तर तूच मला तुझी पूर्णवेळ सेवा करण्यासाठी सेवाकेंद्रात घेऊन जा. त्याप्रमाणे मला सेवाकेंद्रात राहून साधना करण्याची संधी मिळाली.’’ |
त्यांचे मनोगत झाल्यावर पू. नीलेश सिंगबाळ म्हणाले, ‘‘सुश्री (कु.) सुनीता यांनी केलेल्या शिवाच्या उपासनेच्या फलस्वरूप आज काशी नगरीत सोमवारच्याच दिवशी श्री काशी विश्वनाथ शृंगारोत्सवाच्या पवित्र दिनी भगवंताने त्यांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त केले आहे.’’ हे ऐकून उपस्थित असलेल्या सर्व साधकांची भावजागृती झाली. (७.१.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |