हिजाबच्या प्रकरणी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न करणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा नोंद

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबबंदी कायम ठेवण्याच्या दिलेल्या निर्णयाला विरोध करण्यासाठी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न करणार्‍या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांवर आणि एका अधिवक्त्यावर भटकळ  पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अजीम अहमद, मोहिद्दीन अबीर, शारिक आणि अधिवक्ता तैमूर हुसैन गवई यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सरकार धमक्यांपुढे झुकणार नाही ! – उच्च शिक्षणमंत्री अश्‍वथ नारायण

उच्च शिक्षणमंत्री अश्‍वथ नारायण

कर्नाटकचे उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी.एन्. अश्‍वथ नारायण यांनी म्हटले की, जे लोक ‘न्यायालयाचा निर्णय त्यांच्या बाजूने हवा होता’, असे म्हणत आहेत, त्यांच्या धमक्यांपुढे सरकार झुकणार नाही. मुसलमान मुली म्हणत आहेत की, त्या न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करणार नाहीत, तर ते योग्य नाही.