भावनगर (गुजरात) येथे धर्मांधांकडून हिंदूंना सदनिका विकण्याची धमकी !
|
हिंदूबहुल भागांत धर्मांधांना घर नाकारल्यावर आराडाओरडा करणारे आता गप्प का ? – संपादक
भावनगर (गुजरात) – येथील मोखडजी सर्कल भागातील ‘सात्त्विक हाऊसिंग कॉम्प्लेक्स’मध्ये रहाणार्या १५ सदनिकांच्या हिंदु मालकांना त्यांच्या सदनिका विकण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात १०० ते १५० जणांच्या धर्मांधांच्या जमावाने या संकुलात घुसून सदनिका मालकांना ‘सदनिका विका अन्यथा परिणाम वाईट होती’, अशी धमकी दिली होती. गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी अशा प्रकारची घटना घडल्याचे नाकारले आहे. सांघवी यांनी म्हटले, ‘हिंदूंना सदनिका विकण्याचे सांगण्यात आल्याचा दावा खोटा आहे. अशी कोणतीही घटना घडलेली नाही.’ याविषयीचे वृत्त ‘ऑप इंडिया’ या वृत्त संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे.
‘फ्लैट बेचो, नहीं तो भुगतना होगा अंजाम’: 100-150 मुस्लिमों की भीड़ ने सात्विक सोसाइटी में घुसकर हिन्दुओं को धमकाया, गुजरात की घटना#Gujarat https://t.co/Obomxkz8DY
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 16, 2022
१. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार येथे संकुलाच्या शेजारी अन्य काही संकुलांचे बांधकाम होत आहे आणि येथे केवळ धर्मांधांनीच सदनिका आरक्षित केल्या आहेत. त्यांना या भागात त्यांचे प्राबल्य हवे असल्याने ते अन्य धर्मियांना येऊन हाकलून लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
२. काही सदनिका मालकांनी स्थानिक भाजप नेत्याच्या साहाय्याने सदनिका विकण्याचा प्रयत्न करत आहेत. या नेत्याने या मालकांना सांगितले की, आता तुम्हाला सदनिकांचे मूल्य मिळत आहे, ते मोठे आहे. शेजारील इमारतींचे बांधकाम चालू आहे. तेथे धर्मांध रहायला आल्यास तुम्हालाच त्यांचा त्रास होऊ शकतो.
३. काही संघटनांनी प्रशासनाला येथे धार्मिक सद्भाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे.