लँड जिहाद, थूक जिहाद आणि हलाल जिहाद रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अन् हिंदूंचे संघटन हाच प्रभावी उपाय ! – अनिकेत अर्धापूरकर, हिंदु जनजागृती समिती
वणी (यवतमाळ), १६ मार्च (वार्ता.) – धर्मांधांकडून लँड जिहाद, थूक जिहाद, हलाल जिहाद यांच्या माध्यमातून जी आक्रमणे होत आहेत, त्यावर हिंदु राष्ट्राची स्थापना आणि हिंदूंचे संघटन हाच प्रभावी उपाय आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिकेत अर्धापूरकर यांनी केले. येथील ‘जैन ले आऊट’मधील जयवीर हनुमान देवस्थानच्या सभागृहात १३ मार्च या दिवशी सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत हिंदु राष्ट्र-जागृती सभा उत्साहात पार पडली. या वेळी ‘धर्माचरणाचे महत्त्व आणि हिंदु राष्ट्र स्थापन करावयाच्या प्रयत्नांची दिशा’ या विषयावर ते बोलत होते. या सभेचा लाभ परिसरातील अनेक जिज्ञासूंनी घेतला. सूत्रसंचालन श्री. प्रवीण ढेंगळे यांनी केले. या वेळी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची शपथही घेण्यात आली.
सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) भारती हेडाऊ या वेळी म्हणाल्या, ‘‘मंदिरे ही आपल्या धर्माची आधारशीला आहेत. मंदिर सरकारीकरणामुळे भ्रष्टाचार वाढून पूजा-अर्चा करण्यावर बंधने लादली जात आहे. मंदिरे सरकारच्या तावडीतून सोडवण्यासाठी आपण हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होऊया.’’
विशेष
‘पाक्षिक धर्मशिक्षणवर्ग चालू करावा’, अशी मागणी जिज्ञासूंनी केली. जयवीर हनुमान मंदिर देवस्थान समितीचे पुष्कळ साहाय्य लाभले.