होळी आणि धूलिवंदन यांसाठी शासनाकडून नियमावली घोषित !
मुंबई – कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले, तरी होळी आणि धूलिवंदन यांसाठी राज्यशासनाने नियमावली घोषित केली आहे. यात पुढील नियम अंतर्भूत आहेत. यामध्ये रात्री १० वाजण्यापूर्वी होळी करावी, या वेळी ‘डीजे’ लावण्यास बंदी असणार आहे. होळी साजरी करतांना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्याने मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे. महिला आणि मुली यांची खबरदारी घ्यावी. १० वी आणि १२ वीची परीक्षा असल्याने ध्वनीक्षेपक (लाऊड स्पीकर) जोरात लावू नये, जोरात लावल्यास कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही जाती-धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नयेत. धुळवडीच्या दिवशी कुणाला जबरदस्तीने रंग लावू नये, कुणावर पाण्याचे फुगे फेकू नये.