रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून अधिवक्त्यांनी दिलेले अभिप्राय !
१. अधिवक्ता संजीवकुमार जयी, बेळगाव, कर्नाटक.
आश्रमात आल्यावर उत्साहवर्धक वाटत असल्यामुळे या ठिकाणी पुनःपुन्हा यावेसे वाटते ! : ‘आश्रमात येऊन येथील सकारात्मक स्पंदने अनुभवणे, हे माझ्यासाठी नेहमी आनंददायी असते. येथे आल्यावर उत्साहवर्धक वाटत असल्यामुळे या ठिकाणी पुनःपुन्हा यावेसे वाटते. येथे येऊन ‘निःस्वार्थपणे सेवा कशी करावी ?’, हे शिकायला मिळते. आश्रमात आल्यावर भारतासमोर असलेल्या अडचणी आणि त्यांवरील उपाययोजना याविषयी समजले.’ (२६.१२.२०१९)
२. अधिवक्त्या (सौ.) मणी मित्तल, उत्तरप्रदेश
आश्रमात सर्वत्र पुष्कळ सकारात्मकता आणि शांती आहे अन् हा अनुभव शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे ! : ‘आश्रमात प्रवेश करताक्षणी मला शाश्वत आनंदाची स्थिती अनुभवायला मिळाली, तसेच येथे सर्वत्र पुष्कळ सकारात्मकता आणि शांती आहे. मी जे अनुभवले, ते शब्दांत सांगू शकत नाही. आश्रमातील लादीवर आपोआप उमटलेले ‘ॐ’ पाहून आश्चर्य वाटले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याबद्दल जाणून पुष्कळ चांगले वाटले. ‘हिंदु राष्ट्र’ निर्मितीचे कार्य पुढे नेण्यास प्रेरणा मिळाली.’ (२६.१२.२०१९)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |