नाशिक येथील पोलीस ठाण्यात दारू पिऊन पोलिसांचा गोंधळ !
जागरूक नागरिकांची तक्रार
असे पोलीस अवैध दारूविक्रीवर बंदी काय घालणार ? कायदे तोडणार्या अशा कायदेरक्षकांना (?) बडतर्फ करून कडक शिक्षा केली, तरच इतरांवर जरब बसेल ! – संपादक
नाशिक – येथील गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी.के. नगर पोलीस चौकीमध्ये १५ मार्चला रात्री ६ पोलिसांनी दारू पिऊन गोंधळ घातल्याचे उघडकीस आले.
या वेळी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेलेल्या स्थानिक वृद्ध नागरिकाला आत बोलावून दिवे बंद करून पोलिसांनी बेदम मारहाण केली, असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. जेव्हा हा प्रकार परिसरात समजला तेव्हा इथे नागरिकांची मोठी गर्दी जमली. त्या वेळी दारू प्यायलेल्या एका पोलिसाने शिवीगाळ करत तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नागरिकांनी पाठलाग करून त्याला रोखले आणि पोलीस चौकीत आणले. नागरिकांनी या घटनेची माहिती गंगापूर पोलीस ठाण्याला कळवली. तेव्हा तेथील पोलीस अधिकारी या ठिकाणी आले. येथे असलेले ४ पोलीस पसार झाल्याचेही समजते.