सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांची पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक (वय १० वर्षे) हिला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

सभेत बोलतांना सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

१. लढाऊ वृत्ती

अ. ‘हर हर महादेव ।’ ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ ‘जय श्रीराम ।’, या घोषणा ऐकताच फेटा बांधून ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त बोलणार्‍या माझ्या आवडत्या सद्गुरु स्वातीताईच माझ्या डोळ्यांसमोर येतात.

आ. सद्गुरु स्वातीताई सभेत बोलत असतांना त्या मला रणरागिणी झाशीच्या राणीप्रमाणे पुष्कळ तेजस्वी दिसतात.

इ. सभेत सद्गुरु ताईंचे मार्गदर्शन चालू असतांना सर्व जण ते अगदी लक्षपूर्वक आणि शांतपणे ऐकतात. त्यांच्या ओजस्वी वाणीमुळे सर्वत्र चैतन्य पसरते.

ई. त्या जेव्हा मार्गदर्शन करतात, तेव्हा त्यांच्या हातांच्या मुद्रा आणि हावभाव यांमधूनही क्षात्रतेजाचे प्रक्षेपण होते.

२. व्यवस्थितपणा

कु. प्रार्थना पाठक

‘सद्गुरु स्वातीताईंचे (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे) कपाट नेहमी नीटनेटके असते. त्या ज्या वहीत सूत्रे लिहितात, ती वही अगदी व्यवस्थित असते. त्या अतिशय सुवाच्च आणि मोठ्या अक्षरांत सूत्रे लिहितात.

३. प्रेमभाव

अ. सद्गुरु स्वातीताई सर्वच साधकांशी आनंदाने आणि प्रेमाने बोलतात. त्या बालसाधकांशीही प्रेमाने बोलतात. बालसाधकही त्यांच्या येण्याने आनंदी होतात. त्या एवढ्या मोठ्या सद्गुरु असूनही त्यांच्यातील प्रेमभावामुळे त्या लहान मुलांशी लहान होऊन बोलतात.

आ. मी त्यांच्या समवेत कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) आणि कोल्हापूर येथे प्रवास केला आहे. या प्रवासातही त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली. त्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद देऊन छान हसवतात.

४. चूक प्रेमाने सांगणे

मी आधी सावकाश जेवायचे. तेव्हा त्या मला प्रेमाने त्याची जाणीव करून द्यायच्या. त्या मला म्हणायच्या, ‘‘अगं, पटपट जेव.’’ आता मी थोडे पटपट जेवायला शिकले आहे. कधी कधी मी हळू जेवते. तेव्हा मला त्यांची आठवण होते.

५. सद्गुरु स्वातीताईंच्या गाडीच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

अ. सद्गुरु स्वातीताई ज्या गाडीतून प्रवास करायच्या, ती गाडी चैतन्यमय झाली आहे.

आ. त्यांच्या गाडीच्या दाराची मूठ (हँडल) पिवळी झाली आहे.

इ. त्यांच्या गाडीतून कितीही घंटे प्रवास केला आणि गाडी वाहतुकीच्या कोंडीत कितीही वेळ अडकली, तरी मला कधी थकवा आला नाही.

‘या छोट्याशा जिवाला सद्गुरु स्वातीताईंचा सहवास लाभला’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– गुरुदेवांचे आनंदी फूल,

कु. प्रार्थना महेश पाठक (वय १० वर्षे), पुणे (२२.६.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक