‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घाला अन्यथा धार्मिक तेढ निर्माण होईल !’ – ए.आय.यु.डी.एफ्. पक्षाचे खासदार बदरुद्दीन अजमल

  • काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद हा धर्मांधांनी हिंदूंविरुद्ध पुकारलेला जिहादच होता. अशा जिहाद्यांवर कारवाई करण्याची मागणी खासदार अजमल आणि त्यांचे धर्मबांधव चुकूनही करत नाहीत, उलट त्यावरील चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • खासदार अजमल यांची ही मागणी म्हणजे सत्य दडपण्याचाच प्रकार आहे. अशी असत्याची बाजू घेणारे खासदार कसा कारभार करत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक
ए.आय.यु.डी.एफ्. पक्षाचे खासदार बदरुद्दीन अजमल (उजवीकडे)

गौहत्ती (आसाम) – नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर केंद्र सरकार आणि आसाम राज्य सरकार यांनी बंदी घातली पाहिजे अन्यथा समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल, असे विधान आसाममधील धुबरी येथील ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे (ए.आय.यु.डी.एफ्.चे) खासदार बदरुद्दीन अजमल यांनी केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘मी हा चित्रपट पाहिलेला नाही. तथापि देशात आज पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. काश्मीरच्या व्यतिरिक्तही तशाच प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत, त्यावर कुणीही चित्रपट काढलेला नाही.’’

(म्हणे) ‘काश्मीर प्रकरणी निवृत्त न्यायाधिशांच्या वतीने चौकशी करा !’ – फारूख अब्दुल्ला

अशी मागणी करून फारूख अब्दुल्ला हिंदूंचा जिहाद्यांनी केलेला वंशविच्छेद नाकारत आहेत, हे लक्षात घ्या. जर अशीच चौकशी करायची होती, तर अब्दुल्ला काश्मीरचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी असे करून चौकशी का केली नाही ? – संपादक

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला

काश्मीर प्रकरणी सत्य बाहेर येण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांच्या वतीने चौकशी करावी, अशी मागणी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केली.

अब्दुल्ला पुढे म्हणाले, ‘‘प्रत्येक चित्रपटाचे स्वतःचे एक कथानक असते आणि प्रत्येकच कथानक सत्य असले पाहिजे, असे नाही. त्यामुळे सत्य समोर येण्यासाठी काश्मीरमधील घटना कशी झाली ?, का झाली ? कुणी केली ? आदींविषयी चौकशी झाली पाहिजे.’’