‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा !

उद्गीर(जिल्हा लातूर) व फलटण (जिल्हा सातारा)  येथे हिंदु जनजागृती समितीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

उद्गीर (जिल्हा लातूर) – भारत सरकारने आणि चित्रपट परिनिरीक्षण व्यवस्थापनाने संमत केलेला ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सर्वांचे आकर्षण ठरला असून सदर चित्रपटास न्यायालयानेही संमती दिलेली आहे. हा चित्रपट हरियाणा, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्य सरकारांनी करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे , तरी या चित्रपटाला महाराष्ट्र राज्यातही ‘करमुक्त’ करण्याची घोषणा करावी आणि काश्मिरी हिंदूंप्रती सरकारची सहवेदना दर्शवावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी मेघशेट्टी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

उद्गीर (जिल्हा लातूर) येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
उद्गीर (जिल्हा लातूर) येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी एकत्र जमलेले हिंदुत्वनिष्ठ  
फलटण (जिल्हा सातारा) येथील तहसीलदार डॉ. डी.एस्. बोबडे (सावंत) यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

या वेळी अधिवक्ता रमाकांत चटनाळे, अधिवक्ता दत्ता पाटील, अधिवक्ता सुनील रासुरे, सर्वश्री गणेश गायकवाड, रवींद्र हसरगुंडे, व्ही.एस्. कुलकर्णी, साईनाथ चिम्मेगावे, नागेश अंबेगावे, आमेष तिवारी, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री देशमुख, सौ. स्मिता तिवारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

फलटण (जिल्हा सातारा) – ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराचे वास्तव जगासमोर आणले गेले आहे. हा चित्रपट हरियाणा आणि गुजरात येथील सरकारने करमुक्त करण्याचा निर्णय घेतला असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीही करमुक्त करण्याची घोषणा केली आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानेही हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील तहसीलदार डॉ. डी.एस्. बोबडे (सावंत) यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. प्रशांत निंबाळकर, अखिल महानुभाव समाजाचे श्री. अक्षय तावरे, श्री. विक्रम माने, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अक्षय निकम, हिंदुत्वनिष्ठ श्री. अमोल सस्ते, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फलटण (जिल्हा सातारा) येथील सीटी प्राईडच्या व्यवस्थापकांना हिंदुत्वनिष्ठांचे निवेदन

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पहाण्यास समस्त हिंदु समाज उत्सुक आहे, त्यामुळे फलटण (जिल्हा सातारा) येथे प्रदर्शित करावा या मागणीचे निवेदन फलटण येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील सीटी प्राईडचे व्यवस्थापक प्रमोद उद्धव थोकटे यांना देण्यात आले. या वेळी थोकटे यांनी सकारात्मकता दर्शवत ‘हा चित्रपट पुढील सप्ताहात प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो’, असे सांगितले.

गेवराई (जिल्हा बीड) येथील नायब तहसीलदार कांबळे यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

गेवराई (जिल्हा बीड) येथील नायब तहसीलदार कांबळे यांना ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करावा या मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्याम गायकवाड यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.