‘द काश्मीर फाईल्स’ करमुक्त करण्याविषयी भाजपच्या ९२ आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !
मुंबई, १६ मार्च (वार्ता.) – वर्ष १९९० काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराच्या संदर्भातील चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘पावनखिंड’ चित्रपट करमुक्त करण्यात यावेत, या मागणीसाठी भाजपच्या ९२ आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १५ मार्च या दिवशी पत्र दिले आहे.
पावनखिंड आणि काश्मीर फाईल हे चित्रपट करमुक्त करण्यासाठी ९२ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र दिले आहे…! #TheKashmirFiles pic.twitter.com/heM5qnpLFj
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) March 16, 2022
#MiddayNews | #Maharashtra: 92 #MLAs of #BJP sign memorandum seeking tax-free status for #TheKashmirFiles https://t.co/zQwaxYucK0
— Mid Day (@mid_day) March 15, 2022
या पत्रातून या चित्रपटाला महाराष्ट्रात करमुक्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अर्थमंत्री अजित पवार यावर सकारात्मक भूमिका घेतील, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले आहे.