आत्मशक्ती जागृत करून देशोद्धारासाठी सिद्ध व्हा ! – सौ. अश्विनी सरोदे

महिलादिनाच्या निमित्ताने ‘शिवकन्या-शिवप्रेमी ग्रुप’ आयोजित कार्यक्रम !

कार्यक्रमाला उपस्थित महिला

नांदुरा (जिल्हा बुलढाणा), १५ मार्च (वार्ता) – स्त्री ही तिच्यातील सद्गुणांनीच भारतीय संस्कृतीचे रक्षण करू शकते. आजच्या काळातील स्त्रियांनी भारतीय संस्कृतीमधील पूर्वीच्या महान स्त्रियांनी केलेला त्याग आणि धर्माचरण लक्षात घ्यायला हवे. धर्माचरणानेच त्यांच्या जीवनाचे सार्थक होऊ शकते. खर्‍या अर्थाने स्वतःतील आत्मशक्ती जागृत करणे आणि देशोद्धारासाठी सिद्ध होणे, हीच काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अश्विनीताई सरोदे यांनी केले. ८ मार्च या दिवशी जबलेश्वर संस्थान, नांदुरा खुर्द येथे शिवप्रेमी ग्रुप यांनी मुली आणि महिला यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

हिंदु जनजागृती समितीचे जितूभाऊ मोरे यांनीही महिलांना काळानुसार सशक्त आणि निडर बनण्याची आवश्यकता असून आपल्या धर्माप्रती आपण कसे जागृत असायला हवे, याविषयी मार्गदर्शन केले. तसेच साधनेविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सर्वांनी सौ. अश्विनीताई सरोदे आणि जितूभाऊ मोरे यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिताताई बावस्कार यांनी केले. या कार्यक्रमाला भाजप महिला आघाडीच्या पादाधिकारी उपस्थित होत्या.