‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित न करणार्या आगरा येथील चित्रपटगृहाच्या बाहेर राष्ट्रीय हिंदु परिषदेची निदर्शने
नवी देहली – काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित असलेला ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित न करणार्या आगरा येथील चित्रपटगृहाच्या बाहेर राष्ट्रीय हिंदु परिषदेने निदर्शने केली. आगरा येथील संजय चित्रपटगृहाने चित्रपट प्रदर्शित न केल्याने परिषदेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाबाहेर घोषणाबाजी केली. चित्रपटगृहाच्या संचालकांनी चित्रपट प्रदर्शित न केल्यास चित्रपटगृहाला आग लावण्याची चेतावणीही देण्यात आली. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटामध्ये काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराचे वास्तव दाखवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत बसलेल्या काही बड्या लोकांच्या सांगण्यावरून हा चित्रपट प्रदर्शित केला जात नाही. चित्रपट प्रदर्शित न करणे, हे एक षडयंत्र आहे, असा आरोप राष्ट्रीय हिंदु परिषदेचे अध्यक्ष गोविंद पराशर यांनी या वेळी केला.
वितरकाकडून चित्रपट मिळाला नसल्यामुळे तो दाखवता येत नाही, असे संजय चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांनी सांगितले.