सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा केवळ काही मिनिटांचा सत्संग चैतन्याच्या एका उत्साहवर्धक डोससारखा कार्य करणे
उद्या होळी पौर्णिमा (१७ मार्च २०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…
१. ईश्वराशी असलेले अनुसंधान अल्प होणे आणि काही वेळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्याशी बोलण्याची संधी मिळाल्यावर अनुसंधानात वाढ होणे
‘पंधरा दिवसांपासून मी करत असलेल्या प्रार्थना आर्ततेने होत नसल्याने माझे ईश्वराशी अनुसंधान अल्प होत आहे’, असे माझ्या लक्षात येत होते. त्या वेळी मला काही मिनिटे सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्याशी साधनेसंदर्भात बोलण्याची संधी मिळाली. त्यांच्यातील चैतन्यामुळे मला असलेले आध्यात्मिक अडथळे नष्ट झाल्याचे मला जाणवले. माझ्या मनातील अनावश्यक विचार नष्ट होऊन माझे ईश्वराशी अनुसंधान आणि प्रार्थना आर्ततेने होऊ लागल्या. ‘सद्गुरु पदावरील व्यक्तीचा केवळ काही मिनिटांचा सत्संग चैतन्याच्या एका उत्साहवर्धक डोससारखा (बूस्टर डोससारखा) कार्य करतो’, याची मला प्रचीती आली.
२. अध्यात्मातील खरी प्रगती संत आणि गुरु यांच्या कृपेनेच होत असल्याचे अनुभवता येणे
‘साधना वाढवण्यासाठी मी करत असलेले प्रयत्न न्यून आहेत. त्यातून फारसे काही साध्य होणार नाही. ‘सद्गुरूंचा सत्संग आणि त्यांनी चैतन्याच्या स्तरावर केलेले मार्गदर्शन यांमुळेच साधनेला खरी गती मिळत आहे’, याची जाणीव मला या अनुभवातून झाली. ‘मी माझ्या प्रयत्नाने अध्यात्मात काहीतरी प्रगती करू शकतो’, हा केवळ अहंभाव आहे. ‘खरी प्रगती संत आणि गुरु यांच्या कृपेनेच होते’, हे अध्यात्मातील तत्त्व मला पुन्हा एकदा अनुभवता आले.’
– श्री. दत्तात्रय पिसे, सोलापूर (२१.३.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |