सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये प्रवास करत असलेल्या ‘सारथी’ या चारचाकीतील चैतन्यासंबंधी श्री. भूषण कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती
उद्या होळी पौर्णिमा (१७ मार्च २०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…
सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये ‘सारथी’ या चारचाकी वाहनातून साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक ठिकाणी जातात. त्यांच्यातील गुरूंप्रतीचा भाव आणि सेवेची तळमळ यांमुळे चारचाकीत चैतन्य जाणवते. अनेक साधकांनी याची अनुभूती घेतली आहे.
१. चारचाकीजवळ उभे राहिल्यावर आलेली अनुभूती
‘२२.६.२०१९ या दिवशी या चारचाकीपासून अडीच फूट अंतरावर उभा राहून मी एका साधकाशी बोलत होतो. त्या वेळी माझ्या अनाहतचक्राजवळ मला थंडावा जाणवत होता.
२. चारचाकीत बसल्यानंतर आलेल्या अनुभूती
मी चारचाकीत बसल्यानंतर
अ. माझा सलग ‘ॐकार’ चालू झाला.
आ. ‘माझे शरीर वायूप्रमाणे हलके झाले आहे आणि माझा देह आकाशात तरंगत आहे’, असे मला जाणवले.
इ. चारचाकीच्या पुढच्या भागात आणि वाहनचालकाच्या मागील भागातील मधल्या आसनावर ठेवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची छायाचित्रे सजीव भासून मला चारचाकीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवले.’
– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.६.२०१९)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |