सुश्री (कु.) कला खेडेकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. प्रेमभाव : ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या घरी पावसाळ्यात कुणी साधक येत असेल, तर सुश्री (कु.) कलाताई लगेच मला भ्रमणभाष करून प्रेमाने सांगतात, ‘‘घरातील पायर्यांजवळील भाग ओला आहे. साधक त्यावरून घसरू शकतात. काळजी घ्या.’’
२. इतरांचा विचार करणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या घरी काही पाठवण्याविषयी कलाताईंना विचारल्यावर त्या म्हणतात, ‘‘आमच्यासाठी थोडेच पाठव. आश्रमात सर्वांना पुरायला हवे. आमच्या घराच्या बाजूला सहज कुणी येणार असेल, तरच पाठव.’’
३. ताई बोलत असतांना मला पुष्कळ आनंद आणि उत्साह जाणवतो.
४. जाणवलेला पालट : कलाताई पूर्वी पुष्कळ अबोल होत्या. आता त्या माझ्याशी स्वतःहून प्रेमाने आणि आदराने बोलतात.’
– कु. अमृता मुद्गल (वय १९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.२.२०२२)