पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी यांचे जाणवलेले गुणवैशिष्ट्य आणि त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे
‘मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या समवेत सेवा करत असल्याने माझा त्यांच्या सासूबाई पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी यांच्याशी नेहमी संपर्क येतो. एकदा त्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातही आल्या होत्या. त्या वेळी मला जाणवलेले त्यांचे गुणवैशिष्ट्य आणि त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. प्रेमभाव
पू. आजींना प्रथमच भेटल्यावर त्यांनी मला आईप्रमाणे कुशीत घेतले. त्यांनी पहिल्या भेटीतच मला आपलेसे करून घेतले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई कधी घरी गेल्या, तर पू. आजी माझ्याविषयी विचारपूस करतात. एकदा त्यांनी माझ्यासाठी खाऊ पाठवला होता.
२. पू. आजींच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे
अ. पू. आजींना पाहून माझी भावजागृती झाली.
आ. ‘त्या भावस्थितीत आणि वेगळ्या लोकात असून वेगाने आध्यात्मिक प्रगती करत आहेत’, असे मला जाणवले.
इ. त्यांना स्पर्श केल्यावर मला त्यांची त्वचा पुष्कळ मऊ लागत होती.’
अनुभूती
‘पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी संतपदी विराजमान झाल्याची आणि कलाताईंची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याची आनंदवार्ता ऐकून रामनाथी आश्रमातील सर्वांना पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी आश्रमातील वातावरणातही पालट जाणवला आणि तो २ दिवस टिकून होता.’
– कु. अमृता मुद्गल (वय १९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.२.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |