(म्हणे) ‘केंद्र सरकारने अर्थसंकल्पात विस्थापित काश्मिरींसाठी काहीही केले नाही !’ – सुप्रिया सुळे यांची लोकसभेत टीका
केंद्र सरकारने काश्मिरी हिंदूंसाठी काहीही केले नाही, असे सांगणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी ‘त्यांच्या पक्षाने काश्मिरी हिंदूंसाठी इतक्या वर्षांत आवाज का उठवला नाही ?’, याचे प्रथम उत्तर द्यावे ! – संपादक
नवी देहली – तुम्हाला काश्मिरी पंडितांविषयी वाईट वाटत असेल, तर त्यांच्या पुनर्वसनासाठी अर्थसंकल्पात समावेश करा, त्यांच्यासाठी वेगळ्या तरतुदी करा. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात विस्थापित काश्मिरींसाठी काहीही केले नाही. नेहमीच ‘गेल्या ६० वर्षांत त्यांच्यावर किती अन्याय झाला’, हे सांगणे आवश्यक नाही. तुम्हालादेखील सत्तेत येऊन ७ वर्षे झाली आहेत. झाले ते सोडून देत तुम्ही का त्यांना साहाय्य करत नाही ? एखादे मूल जर कुपोषित असेल, तर त्याची आई त्याला ७ वर्षांत चांगले खायला देईल आणि त्याला निरोगी करील, कुपोषणातून बाहेर काढेल. ‘माझे मूल कुपोषित आहे’, असे सांगत फिरणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत जम्मू-काश्मीरच्या संदर्भातील अर्थसंकल्पावरील चर्चेच्या वेळी केंद्र सरकारवर केली. (‘कुपोषित’ मूल सुदृढ करणे, हे सरकारचे काम आहेच; मात्र ज्या लोकांमुळे ते ‘कुपोषित’ झाले, त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. त्याविषयी सुळे जाणीवपूर्वक गप्प रहातात, हे लक्षात घ्या ! – संपादक)
संसद टीवी
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकारने काश्मिरी लोकांना सहस्रो नोकर्यांचे आश्वासन दिले होते; मात्र त्याविषयी काहीही झाले नाही. ‘काश्मिरी पंडितांसाठी सरकार काय करणार आहे’, हे सरकारने सांगावे आणि त्यांच्या भविष्यावर चर्चा करावी. भाजपच्या सदस्यांनी केंद्रशासित प्रदेशात जाऊन वास्तविकता जाणून घ्यावी.