वाई (जिल्हा सातारा) येथे चित्रपट प्रदर्शित करावा ! – भाजपची चित्रपटगृह व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे मागणी

हिंदूबहुल भारतात अशी मागणी करावी लागणे हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! – संपादक

वाई येथील ‘न्यू चित्रा टॉकीज’चे व्यवस्थापक (मध्यभागी) यांना निवेदन देतांना भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते

सातारा, १४ मार्च (वार्ता.) – ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काश्मीर येथील हिंदूंवर झालेल्या अत्याचारावर आधारीत सत्य परिस्थिती सांगणारा ज्वलंत ऐतिहासिक चित्रपट आहे. हा इतिहास भारतियांपासून लपवण्यात आला असून या इतिहासाची माहिती सर्वसामान्य जनतेला होणे आवश्यक आहे. त्यासाठी हा चित्रपट वाई येथील ‘न्यू चित्रा टॉकीज’मध्ये प्रदर्शित करण्यात यावा, अशी मागणी वाई येथील भाजपच्या वतीने ‘न्यू चित्रा टॉकीज’ व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन घाडगे, जिल्हा चिटणीस यशवंत लेले, वाई तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, माजी जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ शेलार, वाई तालुका महिलाध्यक्षा दीपालीताई पिसाळ, वाईच्या माजी नगराध्यक्षा डॉ. प्रतिभाताई शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.