(म्हणे) ‘स्वातंत्र्याच्या काळातील घटना चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत !’
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करण्याची मागणी गृहमंत्र्यांनी फेटाळली !
मुंबई, १४ मार्च (वार्ता.) – ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट मी पाहिलेला नाही. वर्ष १९४७ मध्ये स्वातंत्र्याच्या काळात इकडून जे येणे-जाणे झाले (हिंदू आणि मुसलमान यांचे भारत आणि पाकिस्तानात येणे-जाणे, म्हणजे स्थलांतर चालू होते) त्या वेळी जे झाले, ते चित्रपटात दाखवण्यात आले आहे, असे सांगत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी फेटाळून लावली.
चित्रपट झाल्यानंतर दुसर्या सभागृहात हिंदु जनजागृती विशेष संवाद साधला जातो ! – गृहमंत्री
या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, ‘‘मला येथे लक्षात आणून द्यायचे आहे की, हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना दुसर्या एका सभागृहात नेऊन तेथे ‘हिंदु जनजागृती विशेष संवाद’ केला जातो. काही लोकांनी हे चालू केले; म्हणून काही लोकांनी ‘झुंड’ चित्रपट विनामूल्य दाखवण्यास प्रारंभ केला. समाजामधील अंतर आपल्या कृतीतून निर्माण होते.’’