(म्हणे) ‘योगी आणि महाराज जेव्हा जेव्हा राजकारणात आले, तेव्हा तेव्हा देशाचे वाटोळे झाले !’
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे हिंदुद्वेषी विधान !
|
सोलापूर – योगी आणि महाराज यांची जागा मंदिर अन् मठ येथे आहे, राजकारणात नाही. ते जेव्हा जेव्हा राजकारणात आले, तेव्हा तेव्हा देशाचे वाटोळे झाले, अशी टीका काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. येथे झालेल्या काँग्रेसच्या ‘विजय संकल्प मेळाव्या’त त्या बोलत होत्या. ‘जे काम करतात, त्यांना मत देणे महत्त्वाचे आहे. लोकशाही टिकवायची असेल, तर कामाला महत्त्व द्या’, असेही त्या म्हणाल्या. (कामाला महत्त्व द्यायचे म्हटल्यास ‘स्वातंत्र्यानंतर गेल्या ७४ वर्षांत काँग्रेसने लोकांना काय दिले ?’, याचे उत्तर तरी प्रणिती शिंदे यांच्याकडे आहे का ? काँग्रेस नागरिकांना मूलभूत गरजाही पुरवू शकलेली नाही. त्यामुळे लोक स्वत:च काँग्रेसला त्याची जागा दाखवून देत आहेत ! लोकांची कामे करणार्याला मते मागावी लागत नाहीत, लोक स्वतःहूनच त्याला मते देतात, हे काँग्रेसींना कधी कळणार ? – संपादक)