अमृतसर (पंजाब) येथे निहंग शिखांच्या वेशात आलेल्यांनी केली भगवान शिवाच्या मूर्तीची तोडफोड !
|
(निहंग शीख म्हणजे निळे कपडे परिधान करून शस्त्र बाळणारे शीख. यांना ‘योद्धे’ मानले जाते.)
अमृतसर (पंजाब) – येथे ७ मार्च या दिवशी हरमंदिर साहिब जवळील कठेरिया बाजारात हिंदूंचा धार्मिक उत्सव चालू असतांना पहाटे निहंग शिखांच्या वेशात आलेल्या काही जणांनी भगवान शिवाच्या मूर्तीची तोडफोड केली. ही घटना ‘सीसीटीव्ही’मध्ये चित्रित झाली आहे.
(सौजन्य : Hindustan Tehelka News Channel)
या घटनेविषयी शिवसेनेचे स्थानिक नेते सुधीर सुरी यांनी सांगितले, ‘काही जण आले आणि त्यांनी उत्सवाच्या आयोजकांना शिवीगाळ केली.’
Amritsar: Miscreants dressed as Nihang Sikhs damage Shiva idol at Jagran, Hindu organizations demand actionhttps://t.co/dIuKso471X
— OpIndia.com (@OpIndia_com) March 13, 2022
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)
या घटनेविषयी हिंदु संघटनांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘जर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर धरणे आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे.