श्रीकृष्णा, असाच सेवेतून मिळू दे आनंद करुणाला।
फाल्गुन शुक्ल पक्ष द्वादशी (१५.३.२०२२) या दिवशी मूळची संभाजीनगर येथील आणि आता रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणारी कु. करुणा मुळे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) हिचा १७ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आजीने लिहिलेली कविता पुढे दिली आहे.
कु. करुणा सुजित मुळे हिला १७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
संभाजीनगरची अबोल मोगर्याची कळी ।
रामनाथीच्या वृंदावनी आली अन् तेथे खुलली, फुलली ।। १ ।।
भाग्य तिला लाभले ।
श्रीकृष्णाची कृष्णा म्हणूनी सेवा करण्याचे ।। २ ।।
बागडत, फुलत अन् हसत करते सेवा ।
प्रतीक्षा जन्मोजन्मीची,
किती जन्मांची पुण्याई आली फळाला ।। ३ ।।
जीवन गेले उद्धरूनी ।
प्रसन्न केले श्रीविष्णूला ।। ४ ।।
सुंदर अन् मोहक रूप पाहूनी, दंग झाली ही गोपबाला ।
काय करू अन् काय नको, असे झाले या जिवाला ।। ५ ।।
जन्मोजन्मीचा सखा भेटला ।
तृप्त करी या बालिकेला ।। ६ ।।
किती करावे देवाने लाड अन् कोडकौतुक तिचे ।
पारावार नसे या आनंदाला ।। ७ ।।
किती वर्णू लीला, या नटखट कृष्णाची ।
दावितो सेवेतून वाट मोक्षाची ।। ८ ।।
असाच मिळू दे आनंद करुणाला ।
हीच आस असे मनोमनी सर्वांना ।। ९ ।।
धन्य धन्य झालो गुरुदेवा ।
कृतज्ञ, कृतज्ञ होऊनी आलो आपल्या चरणां ।। १० ।।
– श्रीमती जयश्री मुळे (आजी, वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.३.२०२२)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |