शिकवणी वर्गात हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्या धर्मांध शिक्षकाला अटक
अशा घटनांविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी तोंड का उघडत नाहीत ? – संपादक
बरेली (उत्तरप्रदेश) – शिकवणी वर्गामध्ये शिकण्यासाठी येणार्या हिंदु विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी येथील फरीदपूरमध्ये शिकवणी वर्गाचा संचालक असद औरंगजेब याला अटक केली. भौतिक शास्त्राविषयी अधिक सूत्रे शिकवण्यासाठी असद याने या विद्यार्थिनीला वर्ग संपल्यानंतर थांबवून घेतले होते. त्या वेळी त्याने या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यावर ती असद याच्या तावडीतून वर्गाच्या बाहेर पळाली. घरी जाऊन तिने या घटनेची माहिती दिली. त्यांनतर दुसर्या दिवशी असद याला पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी पकडून चोपले आणि पोलिसांच्या कह्यात दिले.