(म्हणे) ‘काश्मीरमध्ये ३९९ हिंदूंच्या, तर १५ सहस्र मुसलमानांच्या हत्या झाल्या !’

  • ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून केरळ काँग्रेसचे हिंदुद्वेषी ट्वीट

  • विरोधानंतर ट्वीट हटवले !

  • जिहादी आतंकवाद्यांनी सहस्रो हिंदूंच्या अत्यंत क्रूरपणे हत्या केल्या, असंख्य महिलांवर बलात्कार केले, साडेचार लाख हिंदूंना काश्मीरमधून विस्थापित केले, तरी काँग्रेस त्याविषयी अवाक्षरही काढत नाही, हे लक्षात घ्या ! उलट ‘काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंपेक्षा मुसलमानांच्या अधिक हत्या झाल्या’, असे सांगून हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळत आहे ! हा काँग्रेसचा पराकोटीचा हिंदुद्वेष आणि मुसलमानधार्जिणेपणा आहे ! – संपादक
  • अशा काँग्रेसने काश्मिरी हिंदूंना इतक्या वर्षांत न्याय दिला नाही, यात विशेष ते काय ? – संपादक
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून केरळ काँग्रेसचे हिंदुद्वेषी ट्वीट

थिरूवनंतपूरम् (केरळ) – ज्यांनी काश्मिरी हिंदूंना लक्ष्य केले, ते आतंकवादी होते. वर्ष १९९० ते २००७ या १७ वर्षांच्या कालावधीत आतंकवादी आक्रमणात ३९९ काश्मिरी हिंदूंची, तर १५ सहस्र मुसलमानांची हत्या करण्यात आली, असे हिंदुद्वेषी ट्वीट केरळमधील काँग्रेसने त्यांच्या अधिकृत टि्वटर खात्यावरून केले.

या ट्वीटमध्ये काँग्रेसने पुढे म्हटले होते की,

१. तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांच्या निर्देशानुसारच त्या वेळी काश्मीर खोर्‍यातून काश्मिरी हिंदूंचे पलायन झाले होते. जगमोहन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचासरणीचे होते.

२. काश्मिरी हिंदूचे पलायन भाजपपुरस्कृत व्ही.पी. सिंह सरकारच्या काळात चालू झाले.  व्ही.पी. सिंह सरकार डिसेंबर १९८९ मध्ये सत्तेत आले होते. काश्मिरी हिंदूंचे पलायन त्याच्या १ मासानंतर चालू झाले. भाजपने त्याविषयी काहीच केले नाही. व्ही.पी. सिंह सरकारला भाजपचा पाठिंबा नोव्हेंबर १९९० पर्यंत होता.

३. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने जम्मूमध्ये काश्मिरी हिंदूंसाठी ५ सहस्र २४२ घरे बांधली. त्यासह तेथील हिंदूंच्या कुटुंबांना ५ लाख रुपये आर्थिक साहाय्य केले. कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली, तर शेतकर्‍यांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या.

वर्ष १९८८ मध्येच राजीव गांधी यांना देण्यात आली होती आतंकवादाची माहिती !

काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ट्वीटवरून सामाजिक माध्यमांत काँग्रेसवर सडकून टीका करण्यात आली. लोकांनी काँग्रेसवर प्रश्‍नांचा भडीमार केला.

१. टि्वटरवरील ‘पल्लवीसीटी’ नावाच्या वापरकर्त्याने काँग्रेसला ‘तुम्ही असे सांगत आहात, जसे वर्ष १९९० पूर्वी काश्मीरमध्ये सर्व अलबेल होते. तुम्ही हे नाकारू शकता का की, राज्यपाल जगमोहन यांनी वर्ष १९८८ च्या आरंभीपासूनच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना काश्मीरमध्ये आतंकवादी संघटन करत असल्याची माहिती दिली होती’, अशा शब्दांत सुनावले.

२. ‘विजय’ नावाच्या वापरकर्त्याने म्हटले की, राज्यपाल जगमोहन यांनी तत्कालीन केंद्र सरकारला लिहिले होते की, ‘तुम्हाला आणि तुमच्या आसपासच्या लोकांना या (आतंकवादी संघटन करत असल्याच्या) संकेतांकडे लक्ष देण्यासाठी वेळ, रूची आणि दृष्टी नाही.’ जगमोहन यांना सरकारचे काश्मिरी हिंदूंकडे होणारे दुर्लक्ष, हा अपराध वाटत होता.

३. ‘सुमित भसीन’ नावाच्या वापरकर्त्याने काँग्रेसचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे काश्मीरमधील फुटीरतावीदी नेता यासीन मलिक याच्या समवेतचे छायाचित्र प्रसारित करून ‘काँग्रेसने यावर स्पष्टीकरण द्यावे’, अशी मागणी केली.

४. ‘कुमार ४०१८’ नावाच्या वापरकर्त्याने ‘अशा घटना एका दिवसात घडत नाहीत. राजीव गांधी डिसेंबर १९८९ पर्यंत पंतप्रधानपदी होते. काश्मीरमध्ये वर्ष १९८६ पासूनच दंगली चालू झाल्या होत्या. तेव्हा राजीव गांधी यांचेच सरकार सत्तेत होते’, याची आठवण काँग्रेसला करून दिली.

या विरोधानंतर केरळ काँग्रेसने त्यांचे हिंदुद्वेषी ट्वीट हटवले.