रशिया लवकरच ‘नाटो’च्या सदस्य देशांवरही आक्रमण करील ! – युक्रेनची चेतावणी

युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की

कीव (युक्रेन) – रशियाने पोलंड सीमेजवळील युक्रेनच्या सैनिकी प्रशिक्षण तळावर १३ मार्चला आक्रमण झाले. क्रूझ क्षेपणास्त्रांद्वारे करण्यात आलेल्या या आक्रमणात ३५ जणांचा मृत्यू झाला, तर १३४ जण घायाळ झाले. पोलंड ‘नाटो’चा (‘नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’चा) सदस्य देश असून त्या देशाच्या सीमेलगतचा हा प्रशिक्षण तळ हा पाश्‍चिमात्य देशांकडून युक्रेनला साहाय्य पुरवण्यासाठीचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळेच रशियाने या तळावर आक्रमण केल्याचे सांगितले जात आहे. या आक्रमणानंतर युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी ‘नाटो’ देशांना ‘रशिया लवकरच ‘नाटो’च्या सदस्य देशांवरही आक्रमण करील’, अशी चेतवाणी दिली आहे.

या वेळी झेलेंस्की यांनी पुन्हा एकदा ‘नॉटो’ने रशियासाठी ‘नो फ्लाय झोन’ (प्रतिबंधित हवाई क्षेत्र) घोषित करण्याचा पुनरूच्चार केला. युक्रेनची ही मागणी यापूर्वी ‘नाटो’ने फेटाळली होती. ही बंदी न घातल्यामुळेच रशियाने पोलंडच्या सीमाभागांत आक्रमण केल्याचा दावा झेलेंस्की यांनी केला.