विकासकामांसाठी निधी अल्प पडू दिला जाणार नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
पुणे – सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कृषी, सार्वजनिक आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्री कार्यक्रमाची कार्यवाही करून मानवी जीवनमान उंचविण्याकरता प्रयत्न केले जातील.
पुणे, पिंपरी-चिंचवड यांसह जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यास राज्यशासन कटीबद्ध आहे. विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमीपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.