हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात ईश्वराची कृपा संपादन करून सहभागी होऊया ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

नगर, संभाजीनगर, जालना आणि नांदेड येथील धर्मप्रेमींसाठी दोन दिवसांची निवासी कार्यशाळा !

हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव

संभाजीनगर, १४ मार्च (वार्ता.) – ईश्वराची कृपा संपादन करण्यासाठी साधना करायला हवी आणि समवेत हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातही ईश्वराचे आशीर्वाद मिळवण्यासाठी साधना करायला हवी याविषयीचे महत्त्व सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी संभाजीनगर येथील श्री क्षेत्र देवगड येथे दोन दिवसांच्या निवासी कार्यशाळेमध्ये सांगितले. याचे आयोजन १२ आणि १३ मार्च रोजी करण्यात आले होते. पहिल्या दिवसाच्या उद्घाटनपर सत्रात ‘साधनेचे जीवनातील महत्त्व आणि प्रत्यक्ष करावयाचे प्रयत्न’ याविषयी सद्गुरु नंदकुमार जाधव यांचे उपस्थित धर्मप्रेमींसाठी मार्गदर्शन झाले.

हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव आणि फलकावर लिहतांना श्री. वैभव आफळे

हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचा आरंभ शंखनाद आणि सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. हिंदु जनजागृती समितीच्या संभाजीनगर आणि जालना समन्वयक ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या कु. प्रियांका लोणे यांनी कार्यशाळेची प्रस्तावना केली. या कार्यशाळेला नगर, संभाजीनगर, जालना आणि नांदेड जिल्ह्यांतील धर्मप्रेमी उपस्थित होते.

हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना श्री. सुनील घनवट आणि कु. प्रतीक्षा कोरगावकर

विशेष

१. कोरोना काळातील अनुभवलेली मनाची स्थिती, आता युद्धकाळ चालू झाल्यावर मनात आलेले विचार सांगून साधना आरंभ केल्याने झालेले लाभ याविषयी एका सत्रात धर्मप्रेमींनी आपले मनोगत व्यक्त केले.

२. कार्यशाळेतील दिवसभरातील अन्य सत्रांमध्ये धर्मप्रेमींना हिंदु राष्ट्राची मूलभूत संकल्पना, हिंदु जनजागृती समिति आयोजित हिंदु राष्ट्र विषयक विविध उपक्रम या विषयी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या नगर समन्वयक कु. प्रतीक्षा कोरगावकर अन् संभाजीनगर समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी मार्गदर्शन केले.

३. धर्मप्रेमींना हिंदु राष्ट्र संघटक म्हणून कार्य करत असतांना निवेदन देणे, सभांची अनुमती घेणे यांसारख्या विविध सेवा कशाप्रकारे करायला हव्यात यासाठी प्रायोगिक भागांचे आयोजनही केले होते.

क्षणचित्रे

कार्यशाळेला उपस्थित हिंदु धर्माभिमानी

१. उपस्थित सर्व धर्मप्रेमींसाठी सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या चैतन्यमय  वाणीतील भावप्रयोग घेण्यात आला. या वेळी सर्वांनाच ‘आपण अयोध्यानगरीत आहोत आणि साक्षात् हनुमंत दृष्ट काढत आहे’, हे अनुभवता आले.

२. ‘कार्यशाळेतील वातावरण चैतन्यमय आहे आणि आम्ही आनंद अनुभवत आहोत’, असे काही धर्मप्रेमींनी सांगितले.

३. कार्यशाळेच्या एक दिवस आधी सभागृह सेवेसाठी आणि अन्य सेवा यांसाठी काही धर्मप्रेमी उपस्थित राहिले.