आता कर्नाटकातही ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त !
बेंगळुरु (कर्नाटक) – राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी १३ मार्चच्या रात्री ट्वीट करून ʻद कश्मीर फाइल्सʼ हा चित्रपट कर्नाटक राज्यात करमुक्त करण्याची घोषणा केली.
Kudos to @vivekagnihotri for #TheKashmirFiles, a blood-curdling, poignant & honest narrative of the exodus of Kashmiri Pandits from their home land.
To lend our support to the movie & encourage our people to watch it, we will make the movie tax-free in Karnataka.
— Basavaraj S Bommai (@BSBommai) March 13, 2022
बोम्मई यांनी चित्रपटाचे कौतुक करतांना म्हटले आहे की, विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट हा काश्मिरी हिंदूंच्या अतीव दुःखाचे दर्शन घडवतो. चित्ताचा थरकाप उडवेल, असा हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या माध्यमातून काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर अत्यंत वस्तूनिष्ठपणे प्रकाश टाकण्यात आला आहे. यापूर्वी हरियाणा, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांनी हा चित्रपट करमुक्त केला आहे.