संभाजीनगर येथे जुगार खेळणार्‍या पोलीस कर्मचार्‍याला पकडले !

पोलीस आयुक्तालयाच्या भिंतीला खेटून जुगार अड्डा !

  • जुगार खेळणारे पोलीस कधीतरी कायदा आणि सुव्यवस्था राखतील का ? – संपादक

  • अशा भ्रष्ट पोलीस कर्मचार्‍यांना आजन्म कारागृहात टाका ! – संपादक

  • पोलीस कर्मचारी जुगार खेळतांना सापडणे, हे पोलीस यंत्रणेला लज्जास्पद आहे. अशा पोलीस कर्मचार्‍यांना जनतेचे रक्षक म्हणता येईल का ? अशा भ्रष्ट पोलिसांना बडतर्फ करावे ! – संपादक

संभाजीनगर – गेल्या अनेक मासांपासून शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या भिंतीला खेटून असलेल्या बारापुल्ला प्रवेशद्वाराजवळील संजय शेजूळ यांच्या घराच्या गच्चीवर चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने १२ मार्च या दिवशी धाड टाकली. या कारवाईत पथकाने पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी सुरेश इंगळे यांना वर्दीतच जुगार खेळतांना पकडले. त्यांच्याकडे ४० सहस्र रुपये रोख रक्कमही सापडली आहे. त्यामुळे ‘कुंपणच शेत खात आहे’, अशी परिस्थिती शहर पोलिसांची झाली आहे. धाडीत पोलीस कर्मचारी इंगळे सापडल्याने पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. इंगळे यांच्यासह ९ जण जुगार खेळतांना सापडले आहेत.