आश्रमाला भेट देणार्‍या एका अतिथींची आंतरिक स्थिती अचूक ओळखणारे द्रष्टे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले
श्री. राम होनप

साधारण ३ वर्षांपूर्वी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात अन्य राज्यातून एक अतिथी आले होते. त्यांच्यांशी थोड्याच कालावधीत माझी जवळीक झाली. त्यांनी सनातन संस्थेच्या कार्याचे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पुष्कळ कौतुक केले अन् त्यांनी या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. याविषयी मी एकदा परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितले, तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘ते अतिथी पुष्कळ बोलतात; पण प्रत्यक्षात काही करणार नाहीत.’’ हे ऐकल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘ते अतिथी आपल्याला इतका चांगला प्रतिसाद देत आहेत आणि परात्पर गुरु डॉक्टर असे का म्हणत आहेत ?’

या प्रसंगानंतर ते अतिथी रामनाथी आश्रमातून त्यांच्या जिल्ह्यात गेले. ते अतिथी संपर्काच्या वेळी माझ्याशी अध्यात्मप्रसारात सहभागी होण्याच्या दृष्टीने बरेच बोलायचे; पण प्रत्यक्षात ते काही कृती करत नव्हते. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या अतिथींचे सूक्ष्मातून केलेले निदान किती अचूक होते’, हे लक्षात आले.

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.११.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक