रशियाने युक्रेन आणि पोलंड यांच्या सीमेजवळ केला ३० क्षेपणास्त्रांचा मारा !
कीव (युक्रेन) – रशियाने युक्रेन-पोलंड या देशांच्या सीमेजवळ ३० क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनियन अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे आक्रमण यावोरिव तळावर झाले असून यामध्ये ३५ लोक ठार झाले असून १३४ जण घायाळ झाले आहेत. या तळावर ‘नाटो’शी संबंधित सैनिकांना प्रशिक्षित केले जाते. पोलंड हा ‘नाटो’ या संघटनेचा सदस्य देश असल्याने या कारवाईकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत झालेल्या युद्धामध्ये १ सहस्र ३०० हून अधिक युक्रेनियन सैनिक मारले गेले आहेत.
local officials in western Ukraine say a Russian airstrike on a military training base killed at least 35 people and wounded 134. https://t.co/XpQxXS5CNS
— ABC 7 Chicago (@ABC7Chicago) March 13, 2022