गेल्या २५ वर्षांपासून पाकच्या कारागृहात अटकेत असणार्या सैन्याधिकारी मुलाच्या सुटकेसाठी वृद्ध मातेची सर्वोच्च न्यायालयात याचिका !
केंद्र सरकारला सुटकेसाठी प्रयत्न करण्याचा आदेश देण्याची याचिकेद्वारे मागणी
गेल्या २५ वर्षांपासून भारतीय सैन्याधिकारी पाकच्या कारागृहात अटकेत असूनही इतकी वर्षे त्याच्या सुटकेसाठी भारत सरकारने काहीच प्रयत्न केले नसतील, तर ही अक्षम्य चूक आहे. याला तेव्हापासून आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत. अशांनी कितीही प्रायश्चित्त घेतले तरी ते अल्पच ठरेल ! – संपादक
नवी देहली – गेल्या २५ वर्षांपासून पाकच्या कारागृहात असणार्या सैन्याधिकार्याच्या सुटकेसाठी त्यांच्या आईने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला राजनैतिक स्तरावर प्रयत्न करून मुलाची सुटका करण्यासाठी प्रयत्न करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यावर सुनावणी होणार आहे. ८२ वर्षीय माला भट्टाचार्जी यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. त्यांचा मुलगा कॅप्टन संजीत भट्टाचार्जी पाकिस्तानच्या लाहोर येथील कारागृहात बंद आहे. एप्रिल १९९७ मध्ये रात्री गस्तीच्या वेळी गुजरातच्या कच्छ सीमेवर पाकच्या सैन्याकडून कॅप्टन संजीत भट्टाचार्जी यांना अटक करण्यात आली होती.
कैप्टन संजीत भट्टाचार्जी की मां ने लगाई अर्जी, तकरीबन 23 साल से पाकिस्तान की जेल में बंद हैं कैप्टन
(@mewatisanjoo ) https://t.co/W35mVuHjV1— AajTak (@aajtak) March 11, 2022