श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे वटवृक्ष मंदिरासमवेत जिव्हाळ्याचे ऋणानुबंध ! – श्रीमंत शिवाजीराजे भोसले, सातारा

श्रीमंत शिवाजीराजे भोसले (मध्यभागी) यांचा सत्कार करतांना आत्माराम घाटगे ( उजवीकडे), श्रीमंत अमोलराजे भोसले ( डावीकडे )

अक्कलकोट – सातारा संस्थानच्या सर्व कुटुंबियांसह आम्हीही श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. त्यामुळे अक्कलकोटला वेळोवेळी येऊन स्वामी दर्शन घेण्याची इच्छा असते. संधी मिळेल तेव्हा अक्कलकोटला येऊन आम्ही स्वामी समर्थांचे दर्शन घेत असतो. आमच्यावर आणि कुटुंबियांवर स्वामी समर्थांची अपार कृपा आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरासमवेत आमचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत, असे प्रतिपादन सातारा संस्थानचे श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांनी केले.

श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांनी नुकतीच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या वेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद आणि प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. या वेळी ‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा’चे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी आदी उपस्थित होते.