उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी आता वेशभूषेचा नियम
पुरुषांना धोतर, बनियन आणि उपवस्त्र, तर महिलांना साडी नेसणे बंधनकारक
धर्मांध महिलांकडून उपस्थित करण्यात आलेल्या हिजाबच्या अनिवार्यतेविषयी मूग गिळून गप्प बसणार्या पुरो(अधो)गाम्यांना आता श्री महाकालेश्वर मंदिराच्या वेशभूषेच्या नियमावरून मात्र कंठ फुटेल !
उज्जैन (मध्यप्रदेश) – १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील श्री महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहामध्येही आता वेशभूषेचा नियम लागू करण्यात आला आहे. याचे पालन करणार्यांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. याचे पालन करून घेण्याचे दायित्व येथील पुरोहितांकडे देण्यात आले आहे. मंदिर प्रशासन समितीने हा आदेश दिला आहे.
१. मंदिर प्रशासक गणेशकुमार धाकड यांनी सांगितले की, पुरुषांना धोतर, बनियन आणि उपवस्त्र, तर महिलांना साडी नेसणे बंधनकारक करण्यात आले आहे. या वेळी मोजे, चामड्याच्या वस्तू, शस्त्र, भ्रमणभाष आदी गर्भगृहात नेण्यास बंदी असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
२. श्री महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करण्यासाठी दुपारी १ ते ४ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजल्यानंतर भक्तांना गर्भगृहात जाऊन पूजा करायची असल्यास त्यासाठी १ सहस्र ५०० रुपये दान करावे लागणार आहेत. त्याची पावती देण्यात येणार आहे.