रशिया युक्रेनमध्ये निर्माण करू शकते अन्नसंकट !
कीव (युक्रेन) – रशियाने केलेल्या बाँबस्फोटात युक्रेनमधील धान्य गोदामाला आग लागली आहे. रशिया युक्रेनमध्ये अन्न संकट निर्माण करू शकते. कीव शहराचा नाश करण्यासाठी रशिया धडक पावले उचलत आहे. अनेक देशांनी निर्बंध लादले असतांनाही रशिया युक्रेनवर बाँबफेक करण्यापासून परावृत्त झालेला नाही. अमेरिकन प्रशासनाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या प्रवक्त्यांवर बंदी घातली आहे. त्याच वेळी रशियाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात घेरण्याची सिद्धताही चालू केली आहे.