मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची केंद्रीय अन्वेषण शाखेकडून चौकशी !
मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वसुलीच्या प्रकरणात ११ मार्च या दिवशी केंद्रीय अन्वेषण शाखेने (सी.बी.आय्.) ६ घंटे चौकशी केली. पोलीस अधीक्षक या पदावर असतांना पांडे यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना दूरभाष करून अनिल देशमुख यांच्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी प्रभाव टाकल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. परमबीर सिंह यांना आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला. या प्रकरणात अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागले. सध्या या प्रकरणात ते कारागृहात आहेत.