जिहाद्यांचे क्रौर्य आणि हिंदूंचा आक्रोश : ‘द कश्मीर फाइल्स’

चित्रपट समीक्षण

काश्मीरमध्ये १९ जानेवारी १९९० या दिवशी आणि त्यानंतर नेमके काय घडले ? काश्मीरमधील हिंदूंच्या वंशविच्छेदाचे दायित्व कुणाचे ? कायदा आणि सुव्यवस्था दिवसाढवळ्या वेशीवर टांगली जात असतांना पोलीस, प्रशासन, प्रसारमाध्यमे कूचकामी का ठरली ? हिंदू स्वतःचे रक्षण का करू शकले नाहीत ? काश्मीरमधील तत्कालीन सरकारने या वंशविच्छेदाला कसे साहाय्य केले ? त्या परिस्थितीचा आज कोण लाभ घेत आहे ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रवृत्त करणारा अप्रतिम चित्रपट म्हणजे ‘द कश्मीर फाइल्स’ !  श्री. विवेक रंजन अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ११ मार्चला जगभरात प्रसिद्ध झाला. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे विशेष प्रतिनिधी श्री. सागर निंबाळकर यांनी केलेल्या या चित्रपटाचे समीक्षण येथे देत आहोत.

१. जिहादी आतंकवादाच्या वास्तवाला भिडणारा अप्रतिम चित्रपट !

अ. उत्कृष्ट कथा-पटकथा, अप्रतिम छायाचित्रण, कलाकारांची सुयोग्य निवड, परिणामकारक दिग्दर्शन, उच्चतम निर्मितीमूल्ये आणि स्थळ, दिनांक अन् पुराव्यांसह केलेला घटनांचा उल्लेख ही या चित्रपटाची बलस्थाने आहेत.

आ. हा चित्रपट काश्मीरच्या तत्कालीन स्थितीवर प्रकाश टाकतो. शेजारी मित्र म्हणून रहाणार्‍या धर्मांधांनीच हिंदूंचा घात करणे, चांगल्या शासकीय अधिकार्‍यांना धर्मांधांनी काम करू न देणे, पोलीस अधिकार्‍याला गप्प रहाण्यासाठी ‘पद्मश्री’ देणे, व्यवस्थेमुळे पत्रकारांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागणे, विस्थापित हिंदूंची निर्वासितांच्या छावण्यांमध्ये  कुचंबणा होणे, स्वतःच्या नातवालाही धर्मांधांचे अत्याचार सांगू न शकणे इत्यादी हिंदूंनी सहन केलेले अन्याय आणि अत्याचार जनमानसावर बिंबवण्यात चित्रपट यशस्वी झाला आहे.

इ. ‘जगभरात काश्मिरी हिंदूंची व्यथा पोचावी’, यासाठीची हिमालयाएवढी तळमळ या चित्रपटात ठायीठायी जाणवते. जिहादी आतंकवादी आणि त्यांचे पाठीराखे (उदा. राज्यकर्ते, निष्क्रीय अधिकारी, बुद्धीवादी, निधर्मीवादी) यांविरुद्ध असंतोष निर्माण करण्यात चित्रपटाला यश आले आहे.

ई. जवाहरलाल नेहरू विद्यापिठात काश्मिरी युवकालाच काश्मिरी पंडितांविरुद्ध उकसवले जाते. अशा विद्यापिठांतून ‘आझादी’च्या नावाखाली फुटीरतावादी शक्तींना खतपाणी घातले जाते, हे चित्रपटात ठामपणे मांडण्यात आले आहे.

उ. ‘आज काश्मीर जळत आहे, उद्या संपूर्ण भारत जळेल !’, ‘काश्मिरी हिंदूंना न्याय का मिळत नाही ?’, ‘काश्मीर भारताचा अविभाज्य घटक असतांना तेथे एवढा प्रमाद का घडू दिला ?’, ‘काश्मिरी हिंदू आपल्याच देशात विस्थापित का ?’, ‘काश्मिरी हिंदूंना पुन्हा काश्मीर खोर्‍यात वसवले का जात नाही ?’, ‘काश्मिरी हिंदूंच्या दुःस्थितीला सर्वसामान्य हिंदूही उत्तरदायी आहेत’, यांसारखे अनेक संवाद प्रेक्षकांना अंतर्मुख करतात. याशिवाय मुख्य पात्रांव्यतिरिक्त अन्य पात्रांद्वारे पार्श्वभूमीला असलेले संवाद, काश्मिरी गीते या चित्रपटाची धार तीव्र करतात.

२. श्री. अनुपम खेर आणि अन्य कलाकार यांचा सर्वाेत्कृष्ट अभिनय !

या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी केलेल्या अप्रतिम अभिनयाविषयी त्यांचा सन्मानाने उल्लेख केला पाहिजे. काश्मिरी असलेले श्री. खेर यांच्या तोंडवळ्यावरील प्रत्येक भाव काश्मिरी हिंदूंची व्यथा प्रेक्षकांच्या हृदयात थेट पोचवते. आजवरच्या कारकीर्दीतील सर्वाेत्कृष्ट भूमिका त्यांनी साकारली आहे. चिन्मय मांडलेकर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी यांच्यासह सर्वच कलाकारांनी सर्वाेत्कृष्ट अभिनयाद्वारे चित्रपटाला उच्च स्तरावर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे प्रेक्षक कधी हळहळतो, कधी उत्कृष्ट संवादांवर टाळ्या वाजवतो, कधी राष्ट्रप्रेमी घोषणा देतो, तर कधी आतंकवाद्यांना शिव्याही घालतो.

श्री. सागर निंबाळकर

३. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट श्री. विवेक रंजन अग्निहोत्री यांचे असामान्य धाडसच !

‘द कश्मीर फाइल्स’सारखा चित्रपट निर्माण करण्याचे धाडस आजवर कुणीही केलेले नाही. श्री. विवेक रंजन अग्निहोत्री यांना धर्मांध आणि चित्रपटसृष्टीतील प्रस्थापित यांच्याकडून झालेल्या तीव्र विरोधानंतरही ते डगमगले नाहीत. येथून पुढे कदाचित् श्री. अग्निहोत्री यांच्यावर धर्मांधांकडून आक्रमणेही होऊ शकतात. त्यांनी सवंग लोकप्रियतेसाठी कोणतेही आततायी प्रसंग, प्रेमकथा वा गीते या चित्रपटात घुसडलेली नाहीत. हा चित्रपट ‘काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशविच्छेदच झाला’, हे अधोरेखित करतो. तो या अन्यायाला वाचा फोडतो. हा चित्रपट हिंदूच नव्हे, तर जगभरातील मुसलमानेतरांवर ही स्थिती ओढवू नये, यासाठी प्रेक्षकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालतो.

४. हिंदूंना आवाहन आणि श्रीगुरुचरणी प्रार्थना !

प्रत्येक हिंदूने ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाविषयी श्री. अग्निहोत्री यांचे केवळ कौतुक करून थांबू नये. चित्रपटसृष्टीच्या १०० वर्षांत एखादाच असा चित्रपट सिद्ध होऊ शकतो. सहस्रो कोटी रुपये मिळवणार्‍या कोणत्याही मनोरंजनात्मक चित्रपटापेक्षा हा चित्रपट अनेक पटींनी उजवा आहे. या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे पैसे आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या कलाकारांना मिळणार नाहीत. हा चित्रपट पहाणार्‍या प्रत्येक हिंदूमध्ये आतंकवादाविरुद्ध चीड निर्माण व्हावी आणि त्याला राष्ट्र अन् धर्म यांच्यासाठी कार्यरत होण्याची प्रेरणा मिळावी, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना !

– श्री. सागर निंबाळकर, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे विशेष प्रतिनिधी, कोल्हापूर.

चित्रपटातील हृदय हेलावून टाकणारे काही भयावह प्रसंग !

१. हिंदु महिलेला मुले आणि सासरा यांचा जीव वाचवण्यासाठी पतीच्या रक्ताने माखलेले तांदूळ खायला लावणे

२. शासकीय अधिकार्‍यांच्या भर चौकात हत्या करणे आणि तिरंगा हटवणे

३. धर्मांध महिलांनी हिंदु महिलांना रेशनचे धान्य मिळू न देऊन आतंकवादात सहभागी होणे

४. मुसलमानांवर कविता रचणार्‍या हिंदूलाही ठार मारून झाडाला लटकवणे

५. पळून जाणार्‍या हिंदूंतील एका तरुणीला खाऊच्या डब्यात लघवी करावी लागणे

६. जवाहरलाल नेहरू विद्यापिठातून (‘जे.एन्.यू.’मधून) चालू असणारी हिंदु तरुणांची भयावह दिशाभूल (ब्रेनवॉशिंग)

७. रुग्णालयातही हिंदूंना उपचार मिळू न देणे आणि आतंकवाद्यासाठी रक्तदान करणार्‍या हिंदूच्या रक्ताची बाटली फोडून त्याने दिलेले रक्त वाया घालवणे

८. हिंदूंच्या वंशविच्छेदाविषयी तत्कालीन मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री गुलाम नबी आझाद यांचा छुपा पाठिंबा असणे, तसेच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी निष्क्रीय असणे

९. सर्वांसमोर हिंदु महिलेचे कपडे फाडणे आणि तिला वखारीतील करवतीने उभे चिरणे

१०. अत्यंत निर्दयतेने २५ जणांचे सलग मुडदे पाडणे

क्षणचित्रे

१. संपूर्ण चित्रपटगृह प्रेक्षकांनी भरले होते; मात्र त्यात एकही धर्मांध नव्हता.

२. शहरात दिवसभरात केवळ दोन चित्रपटगृहांत प्रतिदिन या चित्रपटाचे केवळ तीनच खेळ आयोजित केले आहेत; मात्र तिन्ही खेळांची पूर्ण तिकिटविक्री आगाऊ (ॲडव्हान्स) झाली होती.

३. प्रेक्षकांमध्ये तरुणांसह मध्यमवयीन लोकांचाही अधिक सहभाग होता.

– श्री. सागर निंबाळकर, कोल्हापूर

गेली १५ वर्षे काश्मिरी हिंदूंसाठी कार्यरत हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनाची आठवण येणे !

‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने वर्ष २००७ पासून ‘फाऊंडेशन अगेन्स्ट कंटिन्युइंग  टेररिझम्’ (फॅक्ट) संस्थेचे काश्मिरी हिंदूंवरील अन्याय दर्शवणारे ‘…आणि जग शांत राहिले !’ हे जागृती करणारे प्रदर्शन लावले जात होते. या प्रदर्शनातील अनेक प्रसंग चित्रपटात पाहून वास्तवाचे भयावह दर्शन घडते.’

– श्री. सागर निंबाळकर, कोल्हापूर

प्रसारमाध्यमांचा हिंदुद्वेष !

बॉलीवूडमध्ये हिंदुद्वेषी आणि धर्मांधप्रेमी चित्रपटांचे पीक आले आहे. अशा चित्रपटांना कथित चित्रपट समीक्षक डोक्यावर घेतात आणि असे समीक्षण अनेक आघाडीच्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केले जाते; मात्र हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडणार्‍या ‘द कश्मीर फाइल्स’विषयी समीक्षण करणे सोडाच, त्याविषयी भाष्य करायलाही बहुतांश प्रसारमाध्यमे सिद्ध नाहीत. अशांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास चूक ते काय ?

– श्री. सागर निंबाळकर

प्रेक्षकांच्या काही प्रतिक्रिया !

१. ‘चित्रपटात प्रेक्षकांना झेपतील आणि ‘सेन्सॉर’ संमत करील, असेच प्रसंग दर्शवले आहेत. तत्कालीन स्थिती यापेक्षा भयावह होती. हिंदु महिलांवर सामूहिक बलात्कार करणे, त्यांच्या पतींसमोर त्यांच्यावर अत्याचार करणे इत्यादींना तेव्हा परिसीमाच नव्हती.’
– एक सैनिक, भारतीय सैन्य

२. ‘आम्ही सिंधी पाकमधून भारतात आलो; पण काश्मीरचा पाक करण्यासाठी झालेले प्रयत्न पाहून काळीज पिळवटून निघाले. तत्कालीन राज्यकर्त्यांना फाशी दिली पाहिजे.’
– एक सिंधी नागरिक

३. ‘हा चित्रपट पाहून हिंदूंनी धडा घेतला पाहिजे. आज धर्मांध मित्रांना किती जवळ करायचे, ते एकदा ठरवलेच पाहिजे. सध्या हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर वेळीच काहीतरी केले पाहिजे.’
– दोन हिंदु युवक