राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : १३.३.२०२२
खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत.
कर्नाटकमधील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यात येणार !
कर्नाटकाच्या विधानसभेत शासनाकडून प्रस्ताव सादर !
कर्नाटकातील भाजप शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! आता देशातील अन्य राज्यांनीही असा निर्णय घेतला पाहिजे, यासाठी हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी प्रयत्न करावा !
‘कर्नाटकमधील भाजप शासनाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारीकरण करण्यात आलेल्या मंदिरांना मुक्त करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. राज्यशासनाच्या अंतर्गत ३४ सहस्र मंदिरे आहेत.’
मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी भक्तांनी योग्य पोषाख घालूनच मंदिरात प्रवेश करावा ! – मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय
हा निर्णय देशातील प्रत्येक मंदिरासाठी लागू करावा, असेच भाविकांना वाटते !
‘मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी भक्तांनी योग्य पोषाख घालूनच मंदिरात प्रवेश करावा. न्यायालय स्वतःचे मत समाजावर थोपवू शकत नाही. पूजेच्या ठिकाणी प्रवेश करत असाल आणि तेथे परंपरेनुसार एखादा पोषाख आवश्यक असेल, तर तोच घालावा, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. ‘ज्या मंदिरांमध्ये पोषाखाचे बंधन आहे, त्यांनी मंदिराबाहेर सूचना फलक लावून याची माहिती द्यावी’, असेही न्यायालयाने म्हटले. मंदिरांना वस्त्र संहिता (ड्रेस कोड) अनिवार्य करण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती.’
‘हलाल’चा पैसा आतंकवाद्यांपर्यंत जातो ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
‘सर्वसामान्य हिंदूंनी हलाल उत्पादनांचा प्रतिक्रार करावा. ‘हलाल’चा पैसा आतकंवाद्यांपर्यंत जात आहे. हा पैसा दंगल घडवणार्या, धर्मांतर करणार्या आणि आतंकवादी पोसणार्या संघटनांकडे वळवला जात आहे. यामुळे ‘हलाल उत्पादन खरेदी करणार नाही’, इतके तरी हिंदूंनी करावे.’
उत्तराखंड सरकारकडून चारधाम मंदिर व्यवस्थापन कायदा रहित !
पुजारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या विरोधाचा परिणाम !
‘पुजारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केलेल्या विरोधानंतर उत्तराखंडमधील भाजप सरकारने चारधाम (बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) मंदिर व्यवस्थापन कायदा रहित केला. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या सरकारने हिवाळी अधिवेशनात हा कायदा रहित करण्याविषयीचे विधेयक संमत करून ते स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे पाठवले होते. राज्यपालांनी त्यावर मोहोर उमटवल्यानंतर हा कायदा रहित झाला. यानंतर सरकारने तशी अधिसूचना काढली आहे. या कायद्याच्या विरोधात भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी न्यायालयात याचिकाही प्रविष्ट केली होती. हा कायदा रहित झाल्यानंतर चारधाम मंदिरांचे व्यवस्थापन पूर्वीप्रमाणेच असणार आहे.’
सावदा (जिल्हा जळगाव) येथील सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर स्वस्तिक, तुळस आणि वारकरी यांची चित्रे रंगवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अश्लाघ्य प्रकार !
‘जळगाव जिल्ह्यातील सावदा येथे सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर डोक्यावर तुळस घेतलेली महिला आणि तुळशीच्या कुंडीवर स्वस्तिक चिन्ह असल्याचे चित्र रेखाटले आहे. समवेत चिपळ्या आणि वीणा घेतलेले वारकरी यांचेही चित्र आहे. हे चित्र ‘स्वच्छ भारत अभियान २०२२’च्या अंतर्गत रंगवण्यात आले हे. (हे आहेत हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचे दुष्परिणाम ! – संपादक)’
होळीविषयी आक्षेपार्ह वाक्य असल्याने ‘बच्चन पांडे’ या आगामी चित्रपटाला सामाजिक माध्यमांतून विरोध !
‘साजिद नाडियाडवाला निर्मित आणि फर्हद सामजी दिग्दर्शित ‘बच्चन पांडे’ या आगामी चित्रपटाचे विज्ञापन (ट्रेलर) प्रसिद्ध झाले आहे. त्यात ‘होली पे गोली’ (होळीच्या दिवशी गोळी) असे वाक्य (टॅगलाईन) पडद्यावर दिसते. हे हिंदूंच्या सणांविषयीचे आक्षेपार्ह वाक्य असल्याने हिंदूंकडून या चित्रपटाला सामाजिक माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. ‘हिंसेचा पुरस्कार करणार्या या चित्रपटातून हिंदूंच्या सणाविषयी अपसमज निर्माण होऊ शकतो’, असे सांगितले जात आहे.’
बिहारमधील ३८ पैकी ३१ जिल्ह्यांतील पाणी पिण्यायोग्य नाही !
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत जनतेला साधे पिण्याचे पाणीही चांगले देऊ न शकणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
‘बिहारच्या विधानसभेमध्ये ‘भूजलाची पातळी आणि गुणवत्ता’ याविषयीचा एक अहवाल नुकताच सादर करण्यात आला. यात राज्यातील ३८ पैकी ३१ जिल्ह्यांतील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पाण्यामध्ये ‘आर्सेनिक’, ‘फ्लोराईड’ आणि ‘आयर्न’ यांचे अतिरिक्त प्रमाण आढळले आहे. या अहवालात पुढे म्हटले आहे की, अनेक भागांतील पाण्यामध्ये विषारी घटक आढळले आहेत. जवळपास ३० सहस्र २७२ ग्रामीण प्रभागांतील (वॉर्डमधील) भूजल रासायनिक पदार्थांमुळे प्रदूषित झाले आहे.’
हवामान पालटामुळे भारताच्या शेतीवर मोठा परिणाम होणार !
‘हवामान पालटामुळे अतीवृष्टी किंवा दुष्काळ, महापूर आणि उष्माघात यांसारख्या घटना घडू शकतात. यासह भारताच्या शेतीवर मोठा परिणाम होण्याची, तसेच उत्पादन अल्प होण्याची शक्यता ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’ या संस्थेच्या अहवालात वर्तवण्यात आली आहे. या अहवालानुसार देशातील समुद्र किनार्यांजवळील शहरे आणि हिमालय यांवर याचे गंभीर परिणाम होणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्या सुधारणांना विलंब करून चालणार नाही, अन्यथा जगासाठी परिणाम फार धोकादायक असतील.’