विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयावरून सामाजिक माध्यमांतून धर्मांधांची दलितांवर टीका
दलितांनी ‘हिंदु राष्ट्रा’साठी मतदान केल्याची टीका !
नवी देहली – देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला ४ राज्यांत पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले आहे. यावरून आता सामाजिक माध्यमांतून धर्मांधांकडून दलितांना शिवीगाळ करण्यात येत आहे.
The crash and burn of Jai Bheem Jai Meem: Islamists and liberals abuse Dalits for ‘making BJP win’https://t.co/PidIJ4GRLp
— OpIndia.com (@OpIndia_com) March 12, 2022
१. ‘तमाशाबीन’ या नावाच्या ट्विटर खात्यावरून म्हटले आहे की, दलितांनी सामाजिक न्याय आधारित जातीकडून स्वतःला हिंदुत्व आधारित दलित राजकारणाकडे स्थलांतरित केले आहे. हा भाजपसाठी सर्वांत मोठा राजकीय लाभ आहे.
२. ‘मोगलआदील’ नावाच्या खात्यावर ‘दलित आता ‘हिंदु राष्ट्र’साठी मतदान करत आहेत’, असे लिहिण्यात आले आहे.