‘कोल्हापूर-मुंबई’ कोयना एक्सप्रेस पुढील आदेश येईपर्यंत पुण्यापर्यंतच धावणार !
सांगली, १२ मार्च (वार्ता.) – खडकी-शिवाजीनगर रेल्वे स्थानकादरम्यान पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी पुणे ते मुंबई रेल्वे मार्गावरील अनेक एक्सप्रेस गाड्या रहित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर येथून मुंबईला जाणारी कोयना एक्सप्रेस ही रेल्वेगाडी १३ मार्चपासून पुढील आदेश येईपर्यंत पुण्यापर्यंतच जाणार आहे. मेट्रो रेल्वेचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे सेवा पूर्ववत् चालू होणार आहे. यामुळे आता कोल्हापूर, मिरज, सांगली येथील प्रवाशांना ही गाडी पुण्यापर्यंतच उपलब्ध होत असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात असुविधा निर्माण होणार आहे.